बागेश्वर महाराजांना पोलिसांचा इशारा

संपूर्ण देशात वादग्रस्त विधानामुळे परिचित असलेल्या बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्री महाराज यांचा मीरा रोड येथे मुंबई कार्यक्रम होणार आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. जोरदार तयारी या कार्यक्रमासाठी सुरू असून बागेश्वर बाबा देखील मुंबई दाखल झाले आहे. त्यांना चोख पोलिस बंदोबस्तात सभेस्थळी घेऊन जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी […]

बागेश्वर महाराजांना पोलिसांचा इशारा

संपूर्ण देशात वादग्रस्त विधानामुळे परिचित असलेल्या बागेश्वर धाम येथील धीरेंद्र शास्री महाराज यांचा मीरा रोड येथे मुंबई कार्यक्रम होणार आहे. लाखोंच्या संख्येने नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा आयोजकांच्या वतीने करण्यात आला आहे. जोरदार तयारी या कार्यक्रमासाठी सुरू असून बागेश्वर बाबा देखील मुंबई दाखल झाले आहे. त्यांना चोख पोलिस बंदोबस्तात सभेस्थळी घेऊन जाणार आहे. यापूर्वी पोलिसांनी आयोजकांना नोटिसही बजावली आहे. कुठला अनुचित प्रकार घडल्यास त्यास संपूर्ण जबाबदारी ही आयोजकांची असेल असा नोटिसमधून एकप्रकारे इशारा देण्यात आला. धार्मिक भावना दुखावणारं वक्तव्य केल्यास कारवाई होणार असल्याचा पोलिसांचा आयोजकांना इशारा दिला आहे.

यापूर्वी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने बागेश्वर बाबाच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नका अशी मागणी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने नाना पाटोले यांनी पत्राद्वारे केली होती. त्यावेळीही संत तुकाराम महाराज यांच्या विषयी जे वक्तव्य केले होते ट्याची आठवण करून देत मागणी केली होती. त्यानंतर या प्रकरणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील उडी घेतली होती.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने यापूर्वी बागेश्वर बाबाकडून करण्यात आलेल्या दाव्यावर आक्षेप घेत खुलं आव्हान दिले होते. त्यानंतर संपूर्ण देशात बागेश्वर बाबा आणि अंनिसचा संघर्ष समोर आला होता. त्यानंतर बागेश्वर बाबाने संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांना माफी मागण्याची वेळ आली होती.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number