राजापूर येथे पोलीस व्हॅन उलटून अपघात

कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण केल जाणार होतं. या सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कोळी बांध येथे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. याठिकाणी पोलीस व्हॅन उलटून 17 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पोलिसांच्या प्रकृतीबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली […]

राजापूर येथे पोलीस व्हॅन उलटून अपघात

कोकणातील प्रस्तावित बारसू सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्पासाठी सोमवारी जमिनीचे सर्वेक्षण केल जाणार होतं. या सर्वेक्षणासाठी निघालेल्या पोलिसांच्या गाडीचा राजापूरच्या कोळी बांध येथे अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. याठिकाणी पोलीस व्हॅन उलटून 17 जण जखमी झाले आहेत. या सर्व जखमी पोलिसांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या पोलिसांच्या प्रकृतीबाबत अद्याप नेमकी माहिती समजू शकलेली नाही. तसेच या अपघाताचं कारणही अद्याप समोर आलेल नाही. या घटनेनंतर बारसू सोलगाव रिफायनरी प्रकल्पाची सर्वेक्षण मोहीम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

कोकणात राजापूर बारसू सोलगाव येथे प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी जिल्हा प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या प्रस्तावित भू सर्वेक्षणला विरोध करण्यासाठी स्थानिक लोकांना हिंसक आंदोलन करण्यासाठी सोशल मीडियाव्दारे व रत्नागिरी जिल्ह्यात येऊन चिथावणी देण्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली. रिफायनरी विरोधी संघटनेच्या दोन पदाधिकायांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर परिसरात 144 कलम लागू करण्यात आलं असून मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व मीडिया प्रतिनिधी नाही प्रस्तावित सर्वेक्षणाचे ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय त्या परिसरात जाऊ नये, अशी विनंती करण्यात आली आहे. प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number