‘सिल्वर ओक’वर पोलीस बंदोबस्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करत पवारांविरोधात घोषणाबाजी केली. याच पार्श्वभूमीवर सिल्वर ओकच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. काल सिल्वर ओकवर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आता पवार कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे […]

‘सिल्वर ओक’वर पोलीस बंदोबस्त

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला. यावेळी कर्मचारी आक्रमक झाले असून त्यांनी चप्पलफेक आणि दगडफेक करत पवारांविरोधात घोषणाबाजी केली. याच पार्श्वभूमीवर सिल्वर ओकच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

काल सिल्वर ओकवर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर आता पवार कुटुंबियांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे.

हल्ल्याचे राज्यात पडसाद

शरद पवार यांच्या घरासमोर संपकारी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलेला हल्ला निंदनीय असून या हल्ल्याचे आता राज्यात पडसाद उमटले आहेत. राज्यात ठिकठिकाणी राष्ट्रवादीकडून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. राज्यात नाशिक, नागपूर, भिवंडी, सोलापूर, जळगावात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

सिल्वर ओकवर झालेल्या घटनेचे पडसाद शनिवारी नागपुरातदेखील उमटले. नागपूरच्या व्हरायटी चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येत काळी रिबीन बांधून मुक आंदोलन केले. भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत शरद पवार यांच्या घरावर केलेल्या हल्ल्याचा निषेध केला. भिवंडीतील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शोएब खान यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत निषेध नोंदवला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number