मागील काही दिवसांत कोरोनामध्ये झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून खबरादीर घेण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. राज्यात कोरोना रुग्णांत वाढ झाली असून सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले आहेत. तसेच दुसरीकडे नागरिक नववर्षाच्या स्वागताची तयारी करत आहेत. त्यामुळे ओमायक्रॉन, कोरोनाचे वाढते रुग्ण आणि नवीन वर्षाचा लोकांमध्ये असलेला उत्साह पाहता ठाणे पोलिसांमार्फत लाँगमार्च घेण्यात आला.
ठाण्यात पोलिसांनी लाँगमार्च काढत स्पीकरच्या माध्यमातून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. नागरिकांना कोरोना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी पोलिसांनी लाँगमार्च काढला. यावेळी पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेत मास्क वापरणे आणि कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. मुंबईत गुरुवारी ३ हजार ६७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाण्यात ८२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची आकडेवारी ५ हजाराहून अधिक झाली आहे. राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्य प्रशासन चिंतेत आले असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.