जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक
नाशिकमध्ये चोरट्यांना पोलिसांचाही धाक राहिलेला नाही. पोलीस स्टेशनच्या बाहेरच चोरट्यांनी आपला प्रताप दाखवला. तोसुद्धा पोलीस कर्मचाऱ्याच्याच सुनेवर.
मुंबई नाका पोलीस स्टेशनशेजारी असलेल्या साहेबा हॉटेलसमोरून चोरट्यांनी सोनसाखळी लांबवली. नायिजा सैय्यद या महिलेची 70 हजार रुपयांची चैन चोरट्यांनी
पळवली.
सोनसाखळी चोरांचा हा प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला. नाजिया ही पोलीस कर्मचाऱ्याचीच सून आहे. आता तरी पोलीस या साखळीचोरांचा बंदोबस्त करतील अशी मागणी
सर्वसामान्य नाशिककर करत आहेत.