महिलांसमोर हस्तमैथुन करणाऱ्या विकृतास पिंपरी चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. काळेवाडी परिसरात हा धक्कादायक प्रकार सुरू होता. दिलीप यादव असं या विकृताचे नाव आहे. मूळचा इलाहाबादचा असणारा दिलीप यादव हा काळेवाडी भागात गवळ्याचं काम करतो.
हा विकृत दिलीप यादव रात्रीच्या वेळेस कोणत्याही सारवजनिक ठिकाणी लहान मुलींना आवाज देऊन बोलावत असे आणि त्यांच्यासमोर हस्तमैथुन करत असे. तसंच महिला दिसल्या की त्यांच्यासमोरच हस्तमैथुन करत असे. अनेकदा महिला लज्जित होऊन तेथून निघून जात. मात्र कुणीही याची वाच्यता करत नसे. सोमवारी सायंकाळी देखील त्याने असाच निर्लज्जपणा केला. तेव्हा मात्र एका महिलेने थेट वाकड पोलीस स्टेशन गाठलं.
या महिलेच्या तक्रारीमुळे दिलीप यादवच्या विकृतपणाची बातमी वाऱ्यासारखी पसरली. आणखी दोन महिलांसमोरही त्याने हस्तमैथुन केल्याचं समोर आलं. पोलिसांनी त्याला तातडीने बेड्या ठोकल्या. महिन्याभरापूर्वी तो काळेवाडीत आला असून, त्याचं हे अश्लील वर्तन नुकतंच पुढे आलंय. हा विकृत इसम आधी कल्याणमध्ये गवळी म्हणून काम करत होता. तिथेही त्याने अशा प्रकारचा किळसवाणा गुन्हा केला आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.