Black Magic Gang : जादूटोणा गँगचा सुळसुळाट! फार्मवर अघोरी पूजेचं साहित्य; पोलिसांकडून नऊ जणांवर अटकेची कारवाई

मालेगाव : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील इला फार्मवर रात्रीच्या सुमारास अघोरी जादूटोण्याचा प्रकार होत असल्याची गुप्त माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळाली. त्यानंतर तालुका पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी छापा टाकला. तिथे पोलिसांना जादूटोण्याचा प्रकार आढळून आला. त्याच ठिकाणी असलेल्या संशयित 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांची चाहूल लागताच एक जण मात्र तेथून […]

Black Magic Gang : जादूटोणा गँगचा सुळसुळाट! फार्मवर अघोरी पूजेचं साहित्य; पोलिसांकडून नऊ जणांवर अटकेची कारवाई

मालेगाव : नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील मुंगसे येथील इला फार्मवर रात्रीच्या सुमारास अघोरी जादूटोण्याचा प्रकार होत असल्याची गुप्त माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळाली. त्यानंतर तालुका पोलिसांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी छापा टाकला. तिथे पोलिसांना जादूटोण्याचा प्रकार आढळून आला. त्याच ठिकाणी असलेल्या संशयित 9 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांची चाहूल लागताच एक जण मात्र तेथून फरार झाला. घटनास्थळी लिंबू, हिरवा कपडा, हळदी कुंड, लाल काळ्या धाग्यात ओवून ठेवलेले लिंबू, काळे मूग, उद, राई इत्यादी पूजेचे साहित्य मिळून आले.

हेही वाचा : Ketan Agrawal Case: '17 कोटींचं लग्न, चार्टर्ड विमानं सगळं खोटं'; सियाच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा, 'माझी ऐपत…

हे सर्व संशयित मालेगाव, कलेक्टर पट्टा, मुंगसे, नाशिक, पुणे, नांदगाव येथील आहेत. या प्रकरणात योगेश देवरे (कलेक्टर पट्टा), राऊत इब्राहिम शेख (द्याने), अरुण इंगळे (साकुरी), सुखदेव मोरे (मुंगसे), साहेबराव निकम (पिंपराळे, तालुका नांदगाव), अशोक रायते (पाटीदार भवन शेजारी सटाणा रोड, मालेगाव), राजेंद्र लोले (मंचर, पुणे), ऋषभ चव्हाण (धावडे वस्ती, भोसरी, पुणे), एक महिला (नाशिक) यांना मालेगाव तालुका पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अबिद महाराज हा मात्र घटनास्थळावरून फरार झाला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व संशयित आरोपींना आज मालेगाव कोर्टात हजर केले असता त्यांना रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेची सविस्तर माहिती मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांनी दिली. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number