पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या त्रुटींचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात उपस्थित करण्यात आला. दरम्यान पंतप्रधानांच्या सुरक्षा त्रुटीप्रकरणी येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. तसेच न्यायालयाने पंजाब पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यामध्ये आढळलेल्या सुरक्षेतील त्रुटींबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारकडून अहवाल मागवण्यात आला आहे. तर पंजाब मुख्यमंत्री चरणचित सिंह याप्रकरणी कारवाई करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र पंतप्रधानांचा वाहनताफा आंदोलनकर्त्यांनी रोखल्यामुळे पंतप्रधानांना १५ ते २० मिनिटे वाटेतच थांबावे लागले. त्यामुळे पंतप्रधानांच्या सुरक्षा यंत्रणेत अक्षम्य चूक झाल्यामुळे पंतप्रधानांची सभा रद्द करण्यात आली. याप्रकरणी सर्वस्तरावरून पंजाब मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्यावर टीका करण्यात येत आहे.