पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 दिवसांत पुन्हा येणार महाराष्ट्र दौऱ्यावर

अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाजनादेश यात्रेची सांगता येत्या 19 तारखेला नाशिक मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला सुरवात केली होती. याच यात्रेची सांगता येत्या 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे. सध्या नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या […]

पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 दिवसांत पुन्हा येणार महाराष्ट्र दौऱ्यावर

अवघ्या पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. महाजनादेश यात्रेची सांगता येत्या 19 तारखेला नाशिक मध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी हजेरी लावणार आहेत.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेला सुरवात केली होती.

याच यात्रेची सांगता येत्या 19 तारखेला नाशिकमध्ये होणार आहे.

सध्या नाशिकच्या तपोवन परिसरात असलेल्या मैदानावर कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे.

या कार्यक्रमाला जवळपास तीन लाख लोक येतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय.

याच अनुषंगाने ही संपूर्ण व्यवस्था करण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौर्‍यात नेमकं कार्यक्रमाची आखणी कशाप्रकारे असणार, या संदर्भात स्थानिक भाजपच्यावतीने बैठकांचं आयोजन करण्यात येतंय.

मोदी करणार गोदेची आरती?

या दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी गोदा आरती करावी अशी मागणीदेखील नाशिक स्थानिक भाजपच्या वतीने करण्यात येणार आहे.

त्यामुळे महाजनादेश यात्रेच्या कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी नाशिक मध्ये गोदा आरती देखील करू शकतात.

महाजनादेश यात्रेच्या सांगता कार्यक्रमाला नरेंद्र मोदी उपस्थित असणार असले तरी या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक प्रकारे नरेंद्र मोदी येणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या प्रचाराला आरंभ करतील, असा अंदाज देखील वर्तवला जातोय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number