पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होल्दोमीर झेलन्स्की यांची भेट घेतली. या भेटीत रशियाचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी पंतप्रधान मोदी यांना निमंत्रण दिले. जपानमधील हिरोशिमा येथे सुरू असलेल्या जी-7 संमेलनादरम्यान मोदींनी ही भेट घेतली. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर या भेटीचे फोटो शेअर केले आहेत.
रशिया आणि युक्रेनमधील युद्धानंतर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये युद्धाच्या परिस्थितीवर आणि त्यावरील राजकीय तोडग्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. दरम्यान, ‘पंतप्रधान मोदींनी युक्रेनला यावं’ असं निमंत्रण रशियाचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी केलं आहे.