मोदींचा ट्विटरवर फॅन्सला रिप्लाय…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याने त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर फॉलोअर्सची संख्या कोट्यवधी झाली आहे. पंतप्रधानांशी जोडले जाण्याचे ते सर्वात सोपे माध्यम आहे. ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पोप फ्रान्सिस यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत. सरकारविरोधी अविश्वास ठराव प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव […]

मोदींचा ट्विटरवर फॅन्सला रिप्लाय…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याने त्यांच्या ट्विटर आणि फेसबुकवर फॉलोअर्सची संख्या कोट्यवधी झाली आहे. पंतप्रधानांशी जोडले जाण्याचे ते सर्वात सोपे माध्यम आहे.

ट्विटरवरील सर्वाधिक फॉलोअर्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि पोप फ्रान्सिस यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्या स्थानावर आहेत.

सरकारविरोधी अविश्वास ठराव प्रस्ताव फेटाळण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. शुभेच्छांप्रमाणेच काही जणांनी त्यांना सल्लेदेखील देऊ केले आहेत. चाहत्यांनी दिलेल्या या सल्ल्यांची मोदींनी हसत मुखानं नोंद घेतली आहे.

दरम्यान, रविवारी ट्विटरवरील आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number