वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पंतप्रधान मोदींनी ‘सौभाग्य’ योजनेची घोषणा केली. या योजनेत अनेक वेगवेगळ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.
देशातील महिलांना केंद्रस्थानी ठेवून केंद्र सरकारने सौभाग्य योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत गरीब कुटुंबांना मोफत वीज कनेक्शन दिलं जाणार आहे.
तब्बल 16 हजार 320 कोटींची ही योजना असणार आहे. या योजनेतंर्गत 5 एलईडी बल्ब, पंखा आणि सोलार पॉवर पॅक वाटले जाणार आहेत.
पंडित दिनदयाळ यांच्या नावानं पंतप्रधान मोदी ‘सौभाग्य’ ही मोठी योजना जाहीर केली.