शिर्डीतील साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप आज पंतप्रधान मोदींच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी मोदींनी केलेले पंतप्रधान आवास योजनेसंदर्भातले भाष्य खोटे असल्याचं
प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.
‘खोटे बोलण्यात पंतप्रधानांचा हात कोणी धरू शकत नाही, हे देशातील जनतेला माहित आहे. मात्र साईबाबांच्या शिर्डीत येऊन पंतप्रधान खोटे बोलले याचे दुःख माझ्यासारख्या देशातील साईभक्तांना झाले’ असंही अशोक चव्हाण यावेळी म्हणाले.
‘युपीए सरकारने चार वर्षाच्या काळात 25 लाख घरे बांधली व तेवढ्याच कालावधीत एनडीए सरकारने 1 कोटी 25 लाख घरे बांधल्याचा खोटा दावा करून पंतप्रधानांनी देशातील जनतेची दिशाभूल केली आहे.’
‘शिर्डीसारख्या पवित्र ठिकाणी येऊन पंतप्रधान खोटे बोलण्याचे दुःसाहस करत आहेत. आता साईबाबांनीच पंतप्रधानांना खरे बोलण्याची सदबुद्धी द्यावी’ अशी प्रार्थना आपण साईबाबांना करणार असल्याचा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.
शिर्डीनंतर पंतप्रधान मोदींची ‘इथेही’ भेट
पंतप्रधान पीक विमा योजनेतून राज्याला तातडीनं मदत देणार – पंतप्रधान