पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यातील मैत्रीपूर्ण केमिस्ट्री पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. रोम दौऱ्यादरम्यान मोदी यांनी मेलोनी यांना दिलेल्या एका खास भेटीने इंटरनेट अक्षरशः गाजवलं आहे. या भेटीत मोदींनी मेलोनी यांना भारतातील प्रसिद्ध ‘Melody’ चॉकलेटचं पॅकेट भेट दिलं, आणि त्यानंतरचा दोन्ही नेत्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शेअर करत ‘Thank you for the gift’ असा संदेश लिहिला. व्हिडीओमध्ये मेलोनी आणि मोदी दोघेही हातात ‘Melody’ चॉकलेटचं पॅकेट धरून दिसतात. मेलोनी हसत म्हणतात, ‘Prime Minister Modi brought us a gift… a very very good toffee,’ त्यावर मोदी ‘Melody’ असं उत्तर देतात. त्यानंतर दोघांमध्ये हलकाफुलका संवाद आणि हास्य पाहायला मिळतं.
PM Modi Gifted Melody To Meloni Video: नरेंद्र मोदी यांच्याकडून जॉर्जिया मेलोनींना मेलोडी चॉकलेट गिफ्ट!#narendramodi #georgiameloni #melody #marathinews #jaimaharashtranews pic.twitter.com/URCMRD2Hyg — Jai Maharashtra News (@JaiMaharashtraN) May 20, 2026
हा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर येताच काही मिनिटांतच #Melodi हा हॅशटॅग पुन्हा ट्रेंड होऊ लागला. अनेकांनी या क्षणाला “इंटरनेट डिप्लोमसी” असं नाव दिलं, तर काहींनी “सर्वात गोड राजकीय क्षण” अशी प्रतिक्रिया दिली. एक्स आणि इन्स्टाग्रामवर या व्हिडीओवर मीम्स, फोटो आणि एडिटेड क्लिप्सचा अक्षरशः पूर आला आहे.
‘Melodi’ हा शब्द सोशल मीडियावर आधीपासूनच लोकप्रिय आहे. नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या नावांमधून तयार झालेला हा शब्द मागील वर्षी G7 परिषदेदरम्यान व्हायरल झाला होता. त्या वेळी मेलोनी यांनी मोदींसोबतचा सेल्फी पोस्ट करत “Hello from the Melodi team” असं म्हटलं होतं. त्यानंतर #Melodi हा हॅशटॅग जगभरात चर्चेत आला होता.
यावेळी रोम दौऱ्यात दोन्ही नेते पुन्हा एकत्र दिसले. त्यांनी कोलोसियमला भेट दिली, डिनर मिटिंग घेतली आणि विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली. मेलोनी यांनी मोदींचं रोममध्ये खास स्वागत करत “Welcome to Rome, my friend” अशी पोस्टही केली होती. या भेटीदरम्यान भारत-इटली संबंध अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात आला.
Thank you for the gift pic.twitter.com/7ePxbJwPbA — Giorgia Meloni (@GiorgiaMeloni) May 20, 2026
सोशल मीडियावर अनेकांनी मोदींच्या या गिफ्टचं कौतुक केलं आहे. भारतातील सर्वसामान्यांना परिचित असलेली ‘Melody’ चॉकलेटआंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेचा विषय बनेल, याची कुणालाही कल्पना नव्हती. मात्र, मोदी आणि मेलोनी यांच्या मैत्रीपूर्ण अंदाजामुळे हा छोटासा क्षण जागतिक स्तरावर व्हायरल झाला आहे.
भारत आणि इटली यांच्यातील वाढती जवळीक आणि दोन्ही नेत्यांमधील सहज संवाद यामुळे ‘#Melodi’ आता केवळ सोशल मीडिया ट्रेंड न राहता एका वेगळ्या राजनैतिक केमिस्ट्रीचं प्रतीक बनला आहे.