बस अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

बुलढाणा बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी […]

बस अपघातावर पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक

बुलढाणा बस अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.बुलढाण्याच्या समृद्धी महामार्गावर बसला आग लागल्याने २५ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर, ८ जण जखमी झाले आहेत. जखमींवर बुलढाणाच्या सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला, तसेच अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांना २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, अपघात झालेली ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने प्रवास करत होती. त्याचवेळी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा गावाजवळ हा अपघात घडला.

पंतप्रधानांचं ट्वीट

या अपघातानंतर शोक व्यक्त करताना पंतप्रधान मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, “महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस अपघाताचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. या अपघातात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे”. सोबतच, पंतप्रधान कार्यालयाकडून अपघातग्रस्तांना मदत जाहीर करण्यात आली आहे. या बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून २ लाख रुपयांची मदत दिली जाईल. तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत दिली जाणार आहे”.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number