जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील नागरिकांसोबत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर संवाद साधतात, तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशातील नागरिकांसमोर आपले विचारही मांडतात.
आज रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ द्वारे देशवासियांसोबत पुन्हा एकदा मोंदीनी संवाद साधला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंतप्रधान मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान ‘पंडित जवाहरलाल नेहरू’ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आठवत त्यांचे अभिवादन केले.
‘मन की बात’ कार्यक्रमाचा आजचा 44वा भाग आहे. या कार्यक्रमात मोंदीनी भारतातील तरुणांना ‘स्वच्छ भारत समर इंटर्नशिप’ या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे, त्याचप्रमाणे मोदींनी क्रीडा व आरोग्य या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही संवाद साधला आहे. या कार्यक्रमात मोदींनी एव्हरेस्ट चढण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या धाडसी वीरांचे अभिनंदन केले आहे.