वृत्तसंस्था, नवी दिल्ली
धो-धो बरसणाऱ्या पावसामुळे बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामध्ये एकूण 418 बळी गेले आहेत. तर 19 जिल्ह्यांमधील 1
कोटी 67 लाख नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. या पुरात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बिहारमधील पुरस्थितीची हेलीकॉप्टरद्वारे पाहणी केली. दरम्यान
पंतप्रधानांनी पूरग्रस्तांसाठी 500 कोटींची मदत जाहीर केली आहे.