सध्या देशातील सर्व शेतकऱ्यांचे लक्ष पंतप्रधान किसान हप्त्याकडे लागले आहे. होळीच्या आधी आनंदाची बातमी मिळणार का? याकडे सर्वच शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला विविध राज्यांमध्ये बँकांच्या सुट्ट्या, तसेच आज होळी सणामुळे व्यवहारांवर परिणाम होणार आहे. त्यामुळे 22 वा हप्ता आज होळीला मिळण्याची शक्यता कमी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली जाते. देशभरातील सुमारे 9 कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत असल्याचा अंदाज आहे. शेतीसाठी बियाणे, खते, औषधे किंवा इतर किरकोळ खर्च भागवण्यासाठी ही मदत उपयोगी ठरते.
ज्या शेतकऱ्यांनी अजूनही eKYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांच्या खात्यात पुढील हप्ता जमा होण्यास विलंब होऊ शकतो. eKYC पूर्ण करण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये अधिकृत पोर्टलवर OTP द्वारे आणि जवळच्या CSC केंद्रावर बायोमेट्रिक पडताळणी करता येईल.