PM Kisan Yojana Installment Update: पीएम किसान योजनेबाबात मोठी अपडेट समोर, आधीचा हप्ता न मिळाल्यास 23 वा हप्ता मिळणार नाही? कारण समोर

ज्यांचा यापूर्वी हप्ता मिळाला नाही. आता त्यांना पुढील हप्ताही मिळणार नाही असा दावा करण्यात येत आहे.

PM Kisan Yojana Installment Update: पीएम किसान योजनेबाबात मोठी अपडेट समोर, आधीचा हप्ता न मिळाल्यास 23 वा हप्ता मिळणार नाही? कारण समोर

केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा सर्व शेतकऱ्यांना मोठा फायदा होताना दिसत आहे.   खात्यात सन्मान निधी जमा झाला नाही, त्यांना 23 वा हप्ता सुद्धा मिळणार नाही का? असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाला आहे.   कारणांमुळे अनेकांचा 22 वा हप्ता अडकला होता. म्हणजे ज्यांचा यापूर्वी हप्ता मिळाला नाही. आता त्यांना पुढील हप्ताही मिळणार नाही असा दावा करण्यात येत आहे.

म्हणजेच तुमच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम येणार नाही असे नाही. केवायसी केलेली नसेल. काही तांत्रिक चुकांमुळे पैसे अडकले असतील तर हप्ता थांबवल्या जातो. तांत्रिक चुका दूर केल्या तर शेतकऱ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा होते. या चुकाही अत्यंत छोट्या असतात. 

मागील हप्ता जमा न  होण्याची कारणं- 

 केवायसी करण्यात आळस केला असेल तर अशा शेतकर्‍यांना 22 वा हप्ता मिळाला नसेल. ही चूक आता परत करू नका. नाहीतर तुमचा 23 वा हप्ताही जमा होणार नाही.

eKYC अपूर्ण – जर तुमची ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण झाली नसेल तर हप्ता अडकण्याची शक्यता अधिक आहे.

शेतजमिनीचा पडताळा– बँक खाते आणि पीएम किसान पोर्टलवर जमीनीचे दस्तावेजांचा पडताळा करणे आवश्यक आहे.

आधार लिंक करण्यात अडचण– तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. DBT (Direct Benefit Transfer) हा पर्याय इनेबल असावा

कागदपत्रावरील नावात चूक – आधार कार्ड आणि बँकेच्या खात्यातील नावात स्पेलिंग वेगळे असेल तर हप्ता जमा होत नाही. 

थांबलेला हप्ता मिळवण्यासाठी काय करावे?

शेतकऱ्यांनी अगोदर pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करावे. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्‍स चेक करा. त्यात ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे लिहिलेले असेल तर लगेचच जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा.

तर फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा. त्यानंतर ही माहिती सबमिट करावी.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number