वृत्तसंस्था, मुंबई
लोकांच्या पसंतीस ठरलेला क्राइम शो ‘सावधान इंडिया’ अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अद्याप चॅनल कडून हा कार्यक्रम बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारची घोषणा केली गेली नाही. सुत्रांच्या माहितीनुसार कार्यक्रम रातोरात ऑफ एयर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सावधान इंडिया हा कार्यक्रम, 8 वेगवेगळे प्रोडक्शन हाऊस चालवत होते. अचानक कार्यक्रम बंद होणार असल्याने कलाकार आणि क्रू मेंबर्सना मजबूत धक्का बसला आहे. हा शो सध्या सुशांत सिंह होस्ट करतोय. याआधी मोहनीश बहल, सिद्धार्थ शुक्ला, हितेन तेजवानी, पूजा गौर, शिवानी तोमर आणि दिव्या दत्ता यांनी होस्ट केला आहे. या शोचे प्रसारण आधी ‘लाइफ ओके’ चॅनलवर केले जात होते. गेल्यावर्षी ‘लाइफ ओके’ चॅनलला ‘स्टार भारत’ नावाने रिलॉन्च करण्यात आलं. त्यानंतर या चॅनलवर सर्व नवे शो होते, मात्र 4 वर्षांपासून चालत आलेला ‘सावधान इंडिया’ हा एकमेव शो दाखविला जात असे.
सुत्रांनुसार, हा कार्यक्रम बंद करण्यामागचं कारण यातील कथानक सादर करण्याच्या पद्धती वरून खूप तक्रारी येत होत्या. म्हणून हा शो थांबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. शहरांसोबत ग्रामीण भागांना जोडणाऱ्या कार्यक्रमांना पसंती देण्यात येत आहे.