प्लास्टिकची अंडी बाजारात पुन्हा आली की काय?

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई मुंबईमध्ये वडापावमध्ये पाल आढळ्याची बातमी ताजी असतानचं मुलंडमध्येही एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडमध्ये राहणाऱ्या चंद्रशेखर देशमुख यांनी मुलुंड पूर्वेतल्या मच्छी मार्केट मधून बुधवारी अंडी खरेदी केली. त्यानंतर घरी गेल्यावर जेव्हा त्यांच्या पत्नीने ऑम्लेट तयार करण्यासाठी अंड फोडलं तेव्हा त्यांना त्या अंड्यामध्ये एक प्लास्टिक सदृश्य पदार्थ दिसून आला. हा पदार्थ नेमका […]

प्लास्टिकची अंडी बाजारात पुन्हा आली की काय?

जय महाराष्ट्र वेब न्यूज, मुंबई

मुंबईमध्ये वडापावमध्ये पाल आढळ्याची बातमी ताजी असतानचं मुलंडमध्येही एक धक्कादायक प्रकार घडला आहे. मुलुंडमध्ये राहणाऱ्या चंद्रशेखर देशमुख यांनी मुलुंड पूर्वेतल्या मच्छी मार्केट मधून बुधवारी अंडी खरेदी केली. त्यानंतर घरी गेल्यावर जेव्हा त्यांच्या पत्नीने ऑम्लेट तयार करण्यासाठी अंड फोडलं तेव्हा त्यांना त्या अंड्यामध्ये एक प्लास्टिक सदृश्य पदार्थ दिसून आला.

हा पदार्थ नेमका प्लास्टिक आहे की काय अशी शंका देशमुख यांना आली. आपला संशय पडताळून पाहण्यासाठी त्यांनी ही अंडी उकडून पाहिली यानंतर त्यांचा संशय अधिकच बळावला अंडी उकडली जरी गेली असली तरीही हे प्लास्टिकचं आवरण तसंच राहिलं होतं त्यावर कोणताही फरक पडला नाही.

आपल्या संशयाला पुष्टी मिळाली यासाठी त्यांनी अंड्याच्या आतलं आवरण जाळूनदेखील पाहिलं आणि चक्क ते जळलेलं आवरण बघून देशमुख यांना धक्काचं बसला. कारण ज्या पद्धतीने प्लॅस्टिक जळतं त्याच प्रमाणे हे आवरणही जळालं होतं.

यामुळे पुन्हा एकदा प्लॅस्टिकची अंडी विक्रीला आली असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number