ठाण्यात १ जुलै पासून प्लास्टिक पिशवीवर बंदी

ठाण्यात १ जुलैपासून प्लास्टिक पिशवीवर बंदी करण्यात आली आहे. एकदा वापरून फेकून देणारे प्लास्टिक बाद होणार आहे. या [प्लास्टिक पिशवी बंदीसाठी कडक मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनि हे निर्देश दिले आहेत. या अधिसूचनेनुसार १ जुलैपासून राज्यात कोणतीच प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरता येणार नाही. तसेच, सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे […]

ठाण्यात १ जुलै पासून प्लास्टिक पिशवीवर बंदी

ठाण्यात १ जुलैपासून प्लास्टिक पिशवीवर बंदी करण्यात आली आहे. एकदा वापरून फेकून देणारे प्लास्टिक बाद होणार आहे. या [प्लास्टिक पिशवी बंदीसाठी कडक मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनि हे निर्देश दिले आहेत. या अधिसूचनेनुसार १ जुलैपासून राज्यात कोणतीच प्लॅस्टिक कॅरीबॅग वापरता येणार नाही. तसेच, सार्वजनिक ठिकाणी वापरण्यात येणारे ग्लास, चमचे, वेगवेगळ्या प्लॅस्टिक वस्तूंचा वापर करता येणार नाही. १ जुलै पासून या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिले आहेत.

महापालिकेने नियोजनबद्ध कार्यक्रम आखून दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये याबाबतची माहिती प्रसिद्ध करावी. प्लॅस्टिकचे निर्मुलन करण्यासाठी यंत्रणांनी पुढाकार घ्यावा. बाजारपेठा तसेच मांस, मटण, मासळी आणि इतर व्यावसायिक यांच्याकडून प्लॅस्टिकचा वापर झाल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करनयेत येईल. ही मोहिम दर आठवड्याला प्रभावीपणे राबवली जाईल. शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक बंदीबाबत शपथ देऊन रॅलीचे आयोजन करनयेत येणार आले आहे. मॉल्समध्ये जनजागृती करावी, असे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

नागरिकांनी देखील महानगरपालिका क्षेत्रात प्रतिबंधीत प्लॅस्टिकचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. प्लॅस्टिक कचरा इथे तिथे न टाकता सुका कचरा व्यवस्थापन केंद्राकडे जमा करावा, कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त करावा. साहित्य, वस्तू खरेदी करताना दुकानदारांना प्लॅस्टिक पिशव्यांचा आग्रह धरु नयेआणि आपण स्वत: घरातून निघताना कापडी पिशव्या सोबत घेवून महापालिकेच्या उपक्रमास सहकार्य, असे आवाहन देखील महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number