जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
गणेशोत्सव पार पडल्यानंतर सुरु होतो तो पितृपक्ष. पितृपक्षात कावळ्याला अनन्यसाधारण महत्व असते. पितरांसाठी घास ठेवला जातो.
कावळ्यानं चोचीनं या घासाला स्पर्श केला किंवा घास खाल्ला तर पितरांनी खाल्ला असा सर्वांचा समज असतो. पण, अनेकदा मुंबईसारख्या शहरात कावळेच दिसत नाहीत.
कावळे असले तरीही ते या अन्नाला स्पर्श करत नाही. चातकासारखी त्यांची वाट पाहावी लागते. याचाच फायदा घेतला तो एका कावळेवाल्याने.
पितरांसाठी ठेवलेल्या घासाला किंवा पिंडाला स्पर्श करुन देण्याचा अनोखा धंदा त्यानं सुरु केलाय. हातात कावळा पकडून तो पिंडाला चोच लावून देतो.
पण, त्याची फी आहे एकदा चोच लावण्यासाठी दहा रुपये. हा व्हिडिओ कोणता आहे माहीत नाही, पण सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.