जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये अंधश्रद्धेचा प्रकार घडला गेला आहे. महापालिकेच्या आचार्य अत्रे सभागृहात भूत असल्याचीबाब समोर आली आहे. एवढच नाहीतर ते भूत पळवून लावण्यासाठी चक्क काही तंत्र-मंत्र केल्याचंही समोर आलं आहे.
या सर्व प्रकाराचा थरारक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे. ही पूजा-अर्चा करण्यासाठी थेट उत्तर प्रदेशहून एका मांत्रिकाला आणण्यात आलं होतं.
पिंपरी चिंचवडमधील अत्रे सभागृहाच्या नूतनीकरणाचं काम सुरु आहे. तिथल्या कामगारांना एका महिलेच्या बांगड्यांचा आवाज येत होता, तसेच ती महिला त्यांना ‘इकडे ये’ असं म्हणायची. तर तिच्यासोबत असणारा एक पुरुष दगड मारायचा. एकदातर एका कामगाराला काम करत असताना अचानक ओरडण्याचा आवाज आला. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडल्याचं कामगार सांगतात.
शेवटी या कामगारांनी मांत्रिकाला बोलावून तीन दिवसांपूर्वी तंत्र-मंत्र केले. मात्र त्यांची भीती कायम असल्याने आता हे कामगार सायंकाळी पाचनंतर काम बंद करतात व आपापल्या घरी निघून जातात.
मात्र, यात आता किती तथ्य आहे हे पाहण गरजेच ठरेल.