Pimpri-Chinchwad Crime: भोरनंतर पुणे पुन्हा हादरलं! तीन वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, नंतर गळा चिरून संपवलं

एका तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलाच अपहरण करून , त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यानंतर त्याचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. 

Pimpri-Chinchwad Crime: भोरनंतर पुणे पुन्हा हादरलं! तीन वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार, नंतर गळा चिरून संपवलं

पुण्यातील नसरापूर येथील घटना ताजी असतानाच आता पिंपरी चिंचवड शहरातील म्हाळुंगे दक्षिण पोलीस स्टेशन हद्दीतील खालुम्ब्रे गावात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. काल संध्याकाळी खालुम्ब्रे गावात आपल्या घरासमोर खेळत असलेल्या एका तीन वर्षाच्या अल्पवयीन मुलाच अपहरण करून , त्याच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यानंतर त्याचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे  खून करणारा आरोपी हा देखील अल्पवयीन आहे. याबाबतची माहिती मिळताच  म्हाळुंगे  पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करून अवघ्या काही तासात अल्पवयीन आरोपीला पुणे रेल्वे स्टेशन परिसरातून ताब्यात घेतल आहे. या घटनेतील मृतक मुलगा हा मध्य प्रदेश राज्यातील असून तो खालुम्ब्रे गावात आपल्या कुटुंबासह भाड्याने राहत होता.  तर आरोपी हा बिहार राज्यातील अल्पवयीन तरुण असून तो बिहार राज्यात पळून जाण्याच्या तयारीत असताना  म्हाळुंगे  दक्षिण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number