आई धावत आली, पण काळाने घात केला; 5 वर्षांच्या चिमुकलीला चितेवर पाहण्याची वेळ, कचरा गाडीच्या चालकासह एकजण ताब्यात

पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाच्या धडकेत अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे.

आई धावत आली, पण काळाने घात केला; 5 वर्षांच्या चिमुकलीला चितेवर पाहण्याची वेळ, कचरा गाडीच्या चालकासह एकजण ताब्यात

पिंपरी :  पिंपरी-चिंचवडमध्ये महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाच्या धडकेत अवघ्या पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील साईनाथ नगर परिसरात काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याच अपघातातील संस्कृती भागवत बिरादार या पाच वर्षांच्या मुलीचे नाव असून हिचा मृत्यू झालेला आहे.

अपघात घडला कसा?
मिळालेल्या माहितीनुसार,  साईनाथ नगर परिसरात महापालिकेचे कचरा संकलन करणारे वाहन आले होते. त्याचवेळी या वाहनाची चिमुकलीला धडक बसली. या अपघातात चिमुकली गंभीर जखमी झाली.  अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान चिमुकलीचा मृत्यू झाला. दुपारी घडलेल्या या घटनेमुळे बिरादार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरातही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा-Jalgaon Crime : हृदयद्रावक! ऐन गणपतीच्या सणाला आपल्या मुलासह महिलेनं उचललं टोकाचं पाऊल; परिसरात हळहळ व्यक्त

दरम्यान, या संपूर्ण अपघाताला कारणीभूत ठरलेले कचरा संकलन वाहन बीवीजे या कंत्राटदार कंपनीचे असल्याची सध्या माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच निगडी पोलिसांनी कारवाई सुरु केली असून कचरा संकलन वाहनाचा चालक राहुल प्रल्हाद चव्हाव, वय 28 वर्षे याला ताब्यात घेतले आहे. राहुलसोबत असलेला राजू कुमार गायकवाड,वय 38 वर्षे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे. या दोघांविरोधात भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास निगडी पोलीस करत असून, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास केला जात आहे.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number