जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कुर्ल्याच्या नेहरूनगर मधे एक दुर्दैवी घटना घडली आहे. नेहरू नगर मधील एसटी डेपो समोर असलेल्या रामकृपा इमारतीत राहणाऱ्या 57 वर्षीय करुणा विजय मोदी ह्या खिडकीतून घरात कबुतर येतात म्हणून ग्रील ला जाळी लावत असताना अचानक ग्रील सह पाचव्या मजल्यावरून खाली पडून मृत्यूखी पडल्या.
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती तसेच बराच रक्तस्त्राव झाला. त्यांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले पण त्यांचा आधीच मृत्यू झाला होता.