Haryana : शिवरायांचा पुन्हा अपमान, रिसॉर्टमधील वॉशरूमच्या साईन बोर्डवर महाराजांची प्रतीमा; शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप

नुकतीच बुलढाण्यात जिल्ह्याच्या चिखला काकड या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणाी वाद झाल्याची घटना ताजी असतानाच हरियाणामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.

Haryana : शिवरायांचा पुन्हा अपमान, रिसॉर्टमधील वॉशरूमच्या साईन बोर्डवर महाराजांची प्रतीमा; शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप

नुकतीच बुलढाण्यात जिल्ह्याच्या चिखला काकड या गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणाी वाद झाल्याची घटना ताजी असतानाच हरियाणामधून एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. हरियाणातील सिकरी येथील एका वॉशरूमच्या प्रवेशद्वारावर या महापुरुषांचे फोटो लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. यावेळी पुरुषांच्या वॉशरूमच्या दरवाजावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो, तर महिलांच्या वॉशरूमच्या दरवाजावर राणी पद्मिनी यांचा फोटो लावण्यात आला होता.

हेही वाचा- Buldhana Chikhla News : संजीवनी वाघ यांचे कपडे कोणी फाडले? चिखला गाव वादातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर; Viral Video

आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देशासाठी एक भावनीक विषय असताना हरियाणातून छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा अत्यंत संतापजनक अवमान झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी याबाबतची माहिती देत संबंधीत प्रकाराची व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून हरियाणा सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. शिवप्रेमी आणि विविध संघटनांनी या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला. 

यावेळी वर्षा गायकवाड यांनी पोस्ट शेअर करत म्हटलं की, “हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी एक आदरणीय व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या प्रतिमेचा अशा प्रकारे गैरवापर केला जाऊ शकत नाही. मी हरियाणा सरकारला विनंती करतो की त्यांनी ही प्रतिमा त्वरित काढून टाकावी. भाजप सरकारे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारशाचा अपमान का करू देतात? हे लज्जास्पद आहे.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number