रशिया-युक्रेन यांच्यात तीन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाच्या लष्करी सैन्यांनी युक्रेनची राजधानी कीवसह इतर प्रमुख शहरांवर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. या तणावग्रस्त परिस्थितीमध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून संवाद साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोवत संवाद साधत झेलेन्स्की यांनी मदतीची मागणी केली आहे. सुरक्षा परिषदेत पाठीशी उभे राहण्याची मागणी झेलेन्स्की यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत संवाद साधून मदतीची मागणी केली असल्याचे झेलेन्स्की यांनी ट्वटि करत सांगितले आहे. त्यांनी ट्विट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधला. रशियाचे लष्करी सैन्य आमच्या भूमीवर आहेत. हे सैन्य नागरी वस्त्यांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे सुरक्षा परिषदेत राजकीय पाठिंबा देण्याची विनंती त्यांनी केली आहे. तसेच आक्रमकांना एकत्र येऊन रोखूयात, असे त्यांनी ट्विट केले.