फायझरचा बूस्टर डोस ओमायक्रॉनवर ९० टक्के प्रभावी?

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने शिरकाव केल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच आता फायझर कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर ९० टक्के प्रभावी असल्याचे एका संशोधनात उघड झाले आहे. तसेच या बूस्टर डोसमुळे मृत्यूदर ९० टक्क्यांनी कमी होण्यास मदत होणार असे इस्त्रआयलमद्ये केलेल्या संशोधनामध्ये समोर आले आहे. या अभ्यासात ५० […]

फायझरचा बूस्टर डोस ओमायक्रॉनवर ९० टक्के प्रभावी?

देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनने शिरकाव केल्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच आता फायझर कोविड लसीचा तिसरा डोस म्हणजेच बूस्टर डोस कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटवर ९० टक्के प्रभावी असल्याचे एका संशोधनात उघड झाले आहे. तसेच या बूस्टर डोसमुळे मृत्यूदर ९० टक्क्यांनी कमी होण्यास मदत होणार असे इस्त्रआयलमद्ये केलेल्या संशोधनामध्ये समोर आले आहे.

या अभ्यासात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला आहे. ज्यांना किमान पाच महिन्यांपूर्वी फायझर लसीचे दोन डोस मिळाल्याचे ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या संशोधन अहवालात म्हटले आहे.

जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची संख्या २६ कोटींच्या पुढे गेली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ५३ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशातच आता जगावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट उद्भवले आहे. देशात नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला आहे. मात्र, आता ओमायक्रॉनच्या संकटामुळे कोरोना लसीच्या तिसऱ्या डोसची गरज भासली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number