कोल्हापुरात पेट्रोल ‘महाराष्ट्र से सस्ता’ कसे ?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरीकडे वाटचाल करत असताना कर्नाटकात मात्र पेट्रोलचे दर अद्यापही 80 रुपयांच्या आत आहे. कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरु असलेली इंधन दरवाढ अजूनही कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे 84.73 रुपयांचा आकडा गाठला. तर डिझेलने लिटरमागे 72.53 रुपयांचा आकडा गाठला आहे.  कोल्हापुरात 84.85 रुपये दर असून शेजारील कोगणोली […]

कोल्हापुरात पेट्रोल ‘महाराष्ट्र से सस्ता’ कसे ?

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

महाराष्ट्रात पेट्रोलचे दर शंभरीकडे वाटचाल करत असताना कर्नाटकात मात्र पेट्रोलचे दर अद्यापही 80 रुपयांच्या आत आहे. कर्नाटकमधील निवडणुकीनंतर सुरु असलेली इंधन दरवाढ अजूनही कायम आहे. मुंबईत पेट्रोलच्या किमतीने उच्चांक गाठला असून पेट्रोलने लिटरमागे 84.73 रुपयांचा आकडा गाठला. तर डिझेलने लिटरमागे 72.53 रुपयांचा आकडा गाठला आहे. 

कोल्हापुरात 84.85 रुपये दर असून शेजारील कोगणोली पेट्रोल पंपावर मात्र 78.63 रुपये असा दर आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील वाहनधारक या पेट्रोल पंपांकडे सध्या धाव घेताना पाहायला मिळत आहेत.

तर मार्केटिंगची हीच संधी साधत महाराष्ट्राच्या नाकावर टिचूनमहाराष्ट्रसे सस्ताअसे फलक लावून ग्राहकांना आकर्षित करत आहेत.

पेट्रोल दरवाढ (पेट्रोलचे दर प्रतिलिटरमागे)

  • १३ मे रोजी ८२.४८ रुपये दर होते.
  • १४ मे रोजी या दरात १७ पैशांची वाढ झाली.
  • १५ मे रोजी १४ पैसे
  • १६ मे रोजी १५ पैसे
  • १७ मे रोजी २२ पैसे
  • १८ मे रोजी २९ पैसे
  • १९ मे रोजी ३० पैसे तर २० मे रोजी तब्बल ३२ पैशांची वाढ झाली.
  • तर मंगळवारी २९ पैशांनी वाढ झाली आहे.
  • म्हणजेच गेल्या नऊ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची वाढ झाली आहे.

पेट्रोल-डिझेलचा उच्चांकी भडका

पेट्रोलचे दर 90 रुपयांपर्यंत भडकण्याची शक्यता

पेट्रोलचा भडका आणखी वाढणार ? पेट्रोल डिझेलवर 1 टक्के सेस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number