इंधन दरवाढीच सत्र अजूनही सुरुच आहे. आजही पुन्हा पेट्रोल 11 पैशांनी तर डिझेल 6 पैशांनी महागलं आहे.
मुंबईत पेट्रोल 90 रुपये 14 पैशे तर डिझेल 78 रुपये 64 पैशाच्या घरात गेलं आहे.
त्यामुळे या इंधनदरवाढीला ब्रेक तरी कधी लागणार? असा प्रश्न वारंवार समोर येत आहे.
आधीच वाढती महागाई आणि त्यात इंधन दरवाढीची जोड या दोन्ही गोष्टींमुळे सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले आहे.
या सततच्या महागाईमुळे आता सामान्य जनता मात्र त्रस्त झाली आहे.