वृत्तसंस्था, नवी दिल्ली
पेट्रोल आणि डिझेल खरेदीबाबत तेल कंपन्यांनी मोठी घोषणा केली आहे.
देशात 16 जूनपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर आता दररोज बदलणार आहेत.
तीन सरकारी तेल कंपन्यांनी या आपल्या जुन्या मागणीवर शिक्कामोर्तब केले आहे.
इंडियन ऑईल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या महत्वांच्या कंपन्यांनी पेट्रोल डिझेलचे दर दररोज बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
इंधनाच्या व्यवहारात जास्त पारदर्शकता यावी, दरातील चढ-उताराचा ग्राहाकांना फटका बसू नये, या उद्देशाने हा निर्णय घेतल्याचं ऑईल कंपन्यांकडून सांगण्यात येत
आहे.