नवी दिल्ली : तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) सोमवार, 25 मे रोजी पुन्हा पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 2.71 रुपयांनी वाढ केली आहे. गेल्या 12 दिवसांत पेट्रोल – डिझेलच्या किमतीत झालेली ही चौथी दरवाढ आहे. दीर्घकाळ दरवाढ थांबवल्यानंतर 15 मे रोजी इंधन दरवाढ पुन्हा सुरू झाल्यापासून, या ताज्या दरवाढीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमधील एकूण वाढ जवळपास प्रति लिटर 7.5 रुपये झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत, सोने खरेदीबाबत वक्तव्य केल्यानंतर देशातील इंधन दरवाढ, दूध दरवाढ तसेच भाजीपाला दरात कमालीची वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
News Alert ! Petrol, Diesel prices hiked for fourth time in less than four weeks. Petrol Increased by Rs. 2.61 in Delhi from Rs 99.51 to Rs. 102.12. Diesel price Increased by Rs. 2.71 in Delhi from Rs 92.49 to Rs 95.20. RSPs of four Metros for 25.05.26 are as under: Petrol:… pic.twitter.com/UP1KqQ4jEL — Press Trust of India (@PTI_News) May 25, 2026
दिल्लीत पेट्रोलचा दर 99.51 रुपयांवरून 102.12 रुपयांपर्यंत 2.61 रुपयांनी वाढला. दिल्लीत डिझेलचा दर 92.49 रुपयांवरून 95.20 रुपयांपर्यंत 2.71 रुपयांनी वाढला.
25 मे 2026 रोजीचे चार मेट्रो शहरांचे दर –
पेट्रोल –
दिल्ली 102.12 (+2.61)
कोलकाता 113.51 (+2.87)
मुंबई 111.21 (+2.72)
चेन्नई 107.77 (+2.46)
डिझेल –
दिल्ली 95.20 (+2.71)
कोलकाता 99.82 (+2.80)
मुंबई 97.83 (+2.81)
चेन्नई 99.55 (+2.57)