पेट्रोल-डिझेलच्या दरात गेल्या दिवसांपासून होणाऱ्या दरवाढीने सामान्य नागरिक त्रस्त झाले होते.
मात्र दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर पेट्रोल-डिझेलच्या दरात घट झाल्यानंतर आजच्या तिसऱ्या दिवशीही पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर 38 पैशांनी तर डिझेलच्या दरात प्रतिलिटर 13 पैशांनी कपात जाहीर केली आहे.
इंधन उत्पादनावरील खर्चात घट झाल्याने ही कपात करण्यात आली आहे, आजच्या दिवशीही इंधन दरवाढ कमी झाल्याने मुंबईत आज पेट्रोल प्रति लिटर 87.46 रुपये आणि डिझेल प्रति लिटर 79.00 रुपयाने स्वस्त झाले आहे