भारतरत्न लतादीदींच्या स्मारकविरोधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला आहे. तर लतादीदींचे बंधू संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे, अशी मंगेशकर कुटुंबीयांची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावरून राजकारण तापले असून स्मारकास विरोध करणारी याचिका दादरमधील स्थानिक रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेत काय […]

भारतरत्न लतादीदींच्या स्मारकविरोधी मुंबई उच्च न्यायालयात याचिका

भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मारकावरून वाद निर्माण झाला आहे. तर लतादीदींचे बंधू संगीतकार पंडीत हृदयनाथ मंगेशकर यांनी लतादीदींचे स्मारक शिवाजी पार्कात व्हावे, अशी मंगेशकर कुटुंबीयांची इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र यावरून राजकारण तापले असून स्मारकास विरोध करणारी याचिका दादरमधील स्थानिक रहिवासी प्रकाश बेलवाडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.

याचिकेत काय म्हटलंय?

दादरमधील शिवाजी पार्क हे खेळाचे मैदान आहे. त्यामुळे यापुढे शिवाजी पार्कमध्ये कोणाचेही स्मृतिस्थळ उभारले जाऊ नये आणि कोणत्याही व्यक्तीचे अंत्यसंस्कार केले जाऊ नये, असे निर्देश राज्य सरकार आणि महापालिकेला द्यावेत, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. शिवाजी पार्कवर यापूर्वी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ उभारले गेले आहे. त्यामुळे शिवाजी पार्कवर यापुढे कोणाचेही स्मृतिस्थळ उभारले जाऊ नये, तसेच तेथे कोणाचे अंत्यसंस्कारही केले जाऊ नये, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही लतादीदींचे शिवाजी पार्कमध्ये स्मारक उभारावे यासाठी विरोध दर्शवला आहे. तसेच शिवाजी पार्क हे शिवजी पार्कच राहिले पाहिजे, त्याची स्मशानभूमी करू नये, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number