जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
घातक रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्यास पात्र असल्याचे आरोग्य प्रमाणपत्र आणि संरक्षण किट नसलेल्या शेतमजुरांना फवारणीचे काम देणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्याची शिफारश सात सदस्यीय एसआयटीने केली आहे. पण, एसआयटीच्या अहवालात कुठल्याही अधिकाऱ्याचे किंवा शेतकऱ्यांचे तसेच, बळी घेणाऱ्या किटकनाशक आणि बीटी बियाणांच्या कंपन्यांची नावे नसल्याने अनेक प्रश्न एसआयटी संदर्भात उपस्थित केले जात आहेत.
हा अहवाल उच्च न्यायायलायच्या नागपूर खंडपीठात सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार सरकारमधील विविध यंत्रणांच्या समन्वयाचा अभाव शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या मागचे मुळ कारण असल्याचं सांगण्यात आले आहे.