जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपुरात पुन्हा एकदा असंवेदनशिलतेचं दर्शन घडलंय. बाजारगाव शिवारात रस्ता ओलांडतांना एका वाघाचा अपघातात मृत्यू झाला. सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर ही घटना घडली. अज्ञान वाहनानं धडक दिल्यानं वाघाचा जागीच मृत्यू झालाय. घटनेनंतर बघ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.
मात्र, बघ्यांनी वाघाच्या मृत्यूच्या दु:खापेक्षा सेल्फीचा कार्यक्रम सुरू केला. सेल्फी काढून नागरिकांनी असंवेदनशिलतेचं दर्शन तर घडवलंच. पण, त्यांच्या या सेल्फीच्या मोहामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची पण कोंडी झाली होती.