माणूसकी गेली ‘तेल’ लावत!

आजच्या दुनियेत खरोखरच माणूसकी संपली आहे का, असा प्रश्न निर्माण करणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. तेलाचे डबे भरून मुंबईहून जालन्याकडे चाललेल्या ट्रकला नगर -पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात पलटी झाला. यात ट्रकचा चालक खाली अडकला. मदतीसाठी तो याचना करित असताना येणा-या-जाणा-या प्रवाशांनी माणुसकी न दाखविता तेलाचे डबे लांबविले. प्रवाशांनी चालकाला मदत न केल्यामुळे चालक जागीच […]

माणूसकी गेली ‘तेल’ लावत!

आजच्या दुनियेत खरोखरच माणूसकी संपली आहे का, असा प्रश्न निर्माण करणारी घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. तेलाचे डबे भरून मुंबईहून जालन्याकडे चाललेल्या ट्रकला नगर -पाथर्डी महामार्गावरील करंजी घाटात पलटी झाला. यात ट्रकचा चालक खाली अडकला. मदतीसाठी तो याचना करित असताना येणा-या-जाणा-या प्रवाशांनी माणुसकी न दाखविता तेलाचे डबे लांबविले. प्रवाशांनी चालकाला मदत न केल्यामुळे चालक जागीच ठार झाला.

करंजा घाटात टेम्पो उलटून अपघात झाला. या अपघातात चालक गंभीररीत्या जखमी झाला. तो टेम्पोमध्ये अडकून पडला होता. यावेळी घाटातून अनेक वाहनं निघून गेली. मात्र एकाही वाहनचालकाने या टेम्पोचालकाला मदत केली नाही. अनेक वाहनं थांबलीही… मात्र या मरणोन्मुख टेम्पोड्रायव्हरला वाचवण्यासाठी नव्हे, तर त्याच्या टेम्पोमधील गोडेतेलाचे कॅन आणि पिशव्या लंपास करण्यासाठी… या घटनेची जवळील ग्रामस्थांना माहिती मिळाल्यावर ते मोटरसायकलने या स्थळी धावून आले. पण त्यांनीही रक्तबंबाळ टेम्पोचालकाला तसंच सोडून तेल चोरून पळून गेले.

पाथर्डी पोलिसांना या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर ते अपघातस्थळी दाखल झाले. तो पर्यंत अनेक लोक तेल चोरून पळून गेले होते. पोलिसांनी जखमी टेम्पोचालकाला शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. मात्र उपचारांना उशीर झाल्यामुळे या टेम्पोचलाकाचा मृत्यू झाला.

टेम्पोड्रायव्हरला वाचवण्यासाठी एक जरी वाहन थांबलं असतं, तरी आज तो टेम्पोचालक जिवंत असता आणि आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करू शकला असता. मात्र मरणाच्या दारात असलेल्या या व्यक्तीकडील वस्तू निर्लज्जपणे चोरून नेण्यात लोकांना पराक्रम वाटला, ही महाराष्ट्रासाठी खरंच अपघाताहूनही जास्त भीषण दुर्घटना आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number