नाशिक शहरात गेल्या काही दिवसांत चक्कर येऊन पडल्याने १२ ते १३ जणांचे मृत्यू झाल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
अर्थात, अशा प्रकारे मृत्यू होण्याची नेमकी कारणे काय आहेत आणि कोणत्या डॉकटरांनी त्यांची तपासणी केली होती, याबाबत कोणताही तपशील उपलब्ध नसल्याचं स्पष्टीकरण महापालिकेच्या वतीनं देण्यात आलं आहे. मागील आठ दिवसात १३ बळी, तर गुरुवारी दिवसभरात ९ जणांचा बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याने हा कोरोनाचा कोणता नवा प्रकार आहे का , ही शंकादेखील उपस्थित केली जात आहे.