नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे, या उत्सवात 9 दिवस देवीची आराधना केली जाते, तसेच 9 दिवस उपवासही केला जातो यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल सोपी आणि झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही तुम्ही झटपट रेसिपी तुम्ही नक्की बनवून पाहा. साहित्य कच्चे शेंगदाणे – 1/2 कप खजूर – 8 किंवा चवीनुसार वेलची पावडर – ½ टी […]
नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे, या उत्सवात 9 दिवस देवीची आराधना केली जाते, तसेच 9 दिवस उपवासही केला जातो यानिमित्त आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल सोपी आणि झटपट रेसिपी घेऊन आलो आहोत. ही तुम्ही झटपट रेसिपी तुम्ही नक्की बनवून पाहा.
साहित्य
कच्चे शेंगदाणे – 1/2 कप
खजूर – 8 किंवा चवीनुसार
वेलची पावडर – ½ टी स्पून
तूप – 1 टेस्पून
मनुका
कृती
प्रथम पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घ्या, त्यानंतर शेंगदाणे थंड झाले की मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवा.
पॅनमध्ये तूप टाका त्यात बारीक केलेले खजूर, शेंगदाणे पावडर आणि वेलची पावडर घाला, हे मिश्रण मंद आचेवर शिजवा.
मिश्रण ठंड झाल्यावर त्याचे लाडूच्या आकाराचे छोटे गोळे करा.