नायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणात तिन वरिष्ठ महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. या तिन्ही डॉक्टारांचा जामीन फेटळण्यात आला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. तसेच तिन्ही डॉक्टरांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मात्र मुंबई सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे तिन्ही डॉक्टरांचे अश्रु अनावर झाले.
डॉ पायल तडवी यांनी रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नायर रुग्णालयात घडली होती.
नायर रुग्णालयातील तीन वरिष्ठ डॉक्टरांनी पायलला तिच्या जातीवरून रॅगिंग केल्यामुळे गळफास लावून आत्महत्या केली.
याप्रकरणी डॉ. भक्ती मेहरे, डॉ. हेमा अहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांना अटक करण्यात आली होती.
राज्य सरकारने नेमलेल्या समितीच्या अहवालात पायलचा जातीवाचक छळ केल्यामुळे आत्महत्या केल्याचे म्हटलं आहे.
आम्ही कारागृहात राहू शकत नाही. आमची लवकरात लवकर जामीन अर्जावर सुनावणी करवी आणि आमची सुटका करा असे तिन्ही डॉक्टर म्हणत होते.
मात्र मुंबई सत्र न्यायालयाने तिघांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.
एवढेच नाही तर, न्यायालयीन कोठडीत 14 वाढ करण्यात आली आहे.