नवी दिल्ली, ९ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: महाराष्ट्रात सर्वात आधी सरकार शरद पवार यांनी पाडले, असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेच्या अधिवेशनात इतिहासाची आठवण करून देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
दरम्यान संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर ८-१० ऑगस्टदरम्यान चर्चा होणार आहे. या प्रस्तावावर काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी चर्चा सुरू केली आहे. यावेळी भाषण करताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी सरकारवर घणाघाती टीका केली होती. भाजपाने ९ वर्षांत ९ सरकारे पाडल्याचा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की,
आम्ही ९ वर्षात ९ सरकारे पाडली. मात्र, सर्वात पहिले महाराष्ट्रात कुणी जर सरकार पाडले असेल तर ते शरद पवार यांनी पाडले. वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडत भारतीय जनसंघाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झाले होते. भाजपचा नाही तर भारतीय जनसंघाचा पाठिंबा घेऊन ते मुख्यमंत्री झाले अशी आठवण करून देतानाच सत्ता कुणी भोगली मुख्यमंत्री कोण झाले असा सवालही सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, भाजपने गेल्या 9 वर्षांत 9 सरकारे पाडल्याचा आरोप करत फोडाफोडीच्या राजकारणावरही टीका केली. मात्र या टीकेला भाजपाकडूनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इतिहासाची आठवण करून देत सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. केंद्रात सत्तेवर असलेल्या मोदी सरकारविरोधात विरोधी पक्षांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चेला सुरुवात झाली आहे. या चर्चेदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर घणाघाती टीका केली.