‘मी धमकीची चिंता करत नाही’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धमकी प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. “राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी या संदर्भात काळजी घ्यावी.” “या राज्यामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने कोणत्याही प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार राज्याच्या प्रत्येक नागरिकाला आहे.” “पण असं असताना धमक्या देऊन कोणी माझा आवाज बंद करू शकेल तर हा गैरसमज आहे. “माझा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था संबंधित […]

‘मी धमकीची चिंता करत नाही’

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी धमकी प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.

“राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांनी या संदर्भात काळजी घ्यावी.” “या राज्यामध्ये लोकशाहीच्या पद्धतीने कोणत्याही प्रश्नावर मत व्यक्त करण्याचा अधिकार राज्याच्या प्रत्येक नागरिकाला आहे.” “पण असं असताना धमक्या देऊन कोणी माझा आवाज बंद करू शकेल तर हा गैरसमज आहे. “माझा महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्था संबंधित यंत्रणा म्हणजेच पोलीस दल यांच्या कर्तृत्वावर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे याची चिंता मी करत नाही.” “पण ज्यांच्या हातात राज्याची सूत्रे आहेत, त्यांना जबाबदारी टाळता येणार नाही.”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुझा दाभोळकर केला जाईल’, अशा स्वरूपाची धमकी ट्विटरद्वारे आणि फेसबुक पोस्टच्या माध्यमातून देण्यात आली आहे. या संदर्भात खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. राष्ट्रवादीचे शिष्ट मंडळाने पोलिस आयुक्त कार्यालयात या संदर्भात पत्रही दिले आहे. पोलीस आयुक्तांनी ‘याप्रकरणी जातीने लक्ष घातले जाईल’, असे आश्वासन सुप्रिया सुळे यांना दिले आहे.

‘पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल’

शरद पवारांना दिलेल्या धमकीची मुख्यमंत्र्यांकडून दखल घेण्यात आली आहे. ‘पवारांच्या सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतली जाईल’, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटरवरुन दिली आहे.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number