‘त्या’ वक्तव्यावरून पवारांवर हल्लाबोल

बुलढाणा येथील भीषण अपघातांवर अनेकजणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो असे लोक सांगतात’, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्र वासी होतो असे लोक सांगतात, असेही ते म्हणाले. परंतु बुलढाणा अपघातानंतर शरद पवारांनी केलेले हे वक्तव्य समाज माध्यमांवर चांगलेच जोर […]

‘त्या’ वक्तव्यावरून पवारांवर हल्लाबोल

बुलढाणा येथील भीषण अपघातांवर अनेकजणांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. ‘समृद्धी महामार्गावर जो अपघातात मृत्यू पावतो तो ‘देवेंद्र’वासी होतो असे लोक सांगतात’, असं म्हणत शरद पवारांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. जो अपघातात मृत्यू पावतो तो देवेंद्र वासी होतो असे लोक सांगतात, असेही ते म्हणाले. परंतु बुलढाणा अपघातानंतर शरद पवारांनी केलेले हे वक्तव्य समाज माध्यमांवर चांगलेच जोर धरत आहे. याच वक्तव्यावर अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

काय म्हणाले भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे?

‘आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की, एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला.’ असं पवार म्हणाले. तुमच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात आणि तुमच्या पक्षाची सत्ता असताना सत्तेची मस्ती अंगात आणून घडलेली हत्याकांडे तुम्ही सोयीस्कर विसरले, पवार गोवारी विसरले, पवार मावळचा गोळीबार विसरले, पवार मुंबईवरचा दहशतवादी हल्लाही विसरले. हे सगळेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात घडले, तुमच्या काळात मृत्यूमुखी पडलेल्यांना ‘शरदवासी’ म्हणायचे का? असा सवाल बावनकुळे यांनी उपस्थित केला.

काय म्हणाले भाजपा नेते प्रसाद लाड?

बुलढाणा मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची देवेंद्रवासी म्हणून चेष्टा करणाऱ्या शरद पवारांची मला कीव यायला लागली आहे. संगतीचा परिणाम काय असतो आता समजायला लागलं आहे. संजय राऊत यांच्या बरोबर राहिल्या नंतर शरद पवारांचं शरद राऊत व्हायला लागलं की काय सत्यता बाहेर यायला लागली आहे. सत्ता गेल्यानंतर माणूस वेडा होतो पण सत्ता गेल्या नंतर अनुभवी माणूस बोलवनपणाचा बोलायला लागतो लोकांन समोर यायला लागला आहे. पवार साहेब आपण जेष्ठ आणि मोठे आहात आपल्या तोंडातून ही भाषा शोभत नाही. आपण बोलण्यावर नियंत्रण ठेवल तर आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना तुमच्यावर टीका करावी लागणार नाही. अशी सडकून टीका भाजप नेते प्रसाद लाड यांनी पवारांवर केली.

काय म्हणाले भाजपा नेते प्रविण दरेकर?

समृद्धी हा राज्यातला उत्तम बांधकाम झालेला महामार्ग आहे. परंतु या अपघाता संदर्भात पवार साहेबांनी व्यक्तव्य केलं ते दुर्दैवी आणि त्याच्या व्यक्तिमत्वाला शोभा देणार नाही. मला वाटतं देवेंद्रजीनी गुगली टाकली त्यातना पवार साहेब क्लिन बोल्ड झाले आहेत. आताच्या अपघाताच्या टिकेवरून पवार साहेबांची ती अस्वस्थता उदविघ्नता असल्याचे दिसून येते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number