जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनं हिवाळी अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी केलीये. 12 डिसेंबरला काँग्रेस-राष्ट्रवादीचा विशाल मोर्चा विधानभवनावर धडकणार आहे.
या मोर्चाचं नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसचे गुलाम नबी आझाद करण्यात आहेत. दोन्ही पक्षांच्या पदाधिऱ्यांनी नागपुरात मोर्चाचं नियोजन केलंय.
काँग्रेसचा मोर्चा दीक्षाभूमीहून तर राष्ट्रवादीचा मोर्चा धनवटे कॉलेजपासून निघणार आहे. यानंतर दोन्ही मोर्चे लोकमत चौकात एकत्र येणार आहेत.