जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकरी कर्जमाफीबाबत राज्य सरकारनं मॅरेथॉन बैठक घेत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची
भेट घेतली. पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली.
शेतकरी कर्जमाफीबाबत मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवारांची चर्चा झाली. शरद पवारांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ही बैठक झाली.
या बैठकीला सुनील तटकरे, दिलीप वळसे-पाटील, जयंत पाटीलही उपस्थित होते. 30 जूनपर्यंत थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं 1 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ
करणार आहोत तसेच नियमित कर्ज भरण्यासाठी वेगळं पॅकेज तयार करतोय, अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली.
याबाबत पवारांनी सूचना केल्याचं त्यांनी म्हटले. राज्याची आर्थिक स्थिती आणि अधिकाधिक शेतकऱ्यांचं समाधान याचा समन्वय साधण्यात मदत करण्याचं पवारांनी
मान्य केले. दरम्यान कर्जमाफीबाबत उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाणांनीही भेटणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.