‘पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे’ – चंद्रशेखर बावनकुळे

विधान परिषद निवडणुकी तोंडावर असताना प्रदेशाध्यक्ष नाटा पटोले यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली. काँग्रेसने डॉ. रविंद्र भोयर यांना बदलून त्यांच्याऐवजी मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘नाना पटोले हे हतबल झाले असून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे. नाना पटोले काँग्रेसला न्याय देऊ शकले नाही. […]

‘पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे’ – चंद्रशेखर बावनकुळे

विधान परिषद निवडणुकी तोंडावर असताना प्रदेशाध्यक्ष नाटा पटोले यांच्यावर उमेदवार बदलण्याची नामुष्की ओढावली. काँग्रेसने डॉ. रविंद्र भोयर यांना बदलून त्यांच्याऐवजी मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘नाना पटोले हे हतबल झाले असून त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला पाहिजे. नाना पटोले काँग्रेसला न्याय देऊ शकले नाही. निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसच्या दोन मंत्र्यांनी दबाव टाकल्याने नाना पटोले यांनी उमेदवार बदलला. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. पक्षाच्या मंत्र्यांवर पटोले यांचे नियंत्रणन नाही. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला पाहिजे’, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

‘दोन मंत्र्यांच्या दबावाखाली येऊन पटोले यांनी उमेदवार बदलला. मंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असाल तर नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्ष बनण्याची लायकी नाही. त्यामुळे पटोले यांनी राजीनामा देऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांना हटवले पाहिजे’, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने पक्षाकडून डॉ. रविंद्र भोयर यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र निवडणुक तोंडावर आली असताना उमेदवार बदलण्यात आला आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशनानुसार अपक्ष उमेदवार मंगेश देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसच्या या कृतीमुळे भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल डॉ. रविंद्र भोयर तोंडघशी पडले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number