जय महाराष्ट्र न्यूज, पूणे
पुण्यात रिक्षा चालकांनी वीस रुपयेे देण्याच्या वादातून रविवार पेठेत एका प्रवाश्याचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहेे. तानाजी धोंडीराम कोरके अस मृत्यू झालेल्या व्यक्तीच नाव असून याप्रकरणी फरासखाना पोलिसानी दोघांना अटक केली आहे.
ही घटना शनिवारी दुपारी रविवार पेठ या गजबलेल्या ठिकाणी घडली आहे. मयत तानाजी कोरके रिक्षा चालक अतुल उर्फ ईश्वर हराळे याच्या रिक्षात पुणे स्टेशनपासून बसला तो रविवार पेठ व गणेश पेठ दरम्यान उतरला.
रिक्षा भाडं चाळीस रुपये झाले तानाजी कडे देण्यासाठी वीसच रुपये होते वीस नव्हते यातून वाद सुरू झाला. त्यावेळी आरोपींनी साथीदाराच्या मदतीनं लाथा बुक्यांनी मारहाण केली त्यात तो बेशुद्ध झाला मात्र काही वेळानी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसानी त्याला उपचाराला आरोपीच्याच रिक्षातून घेऊन गेले.
मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याच ससूनच्या डॉक्टरांनी सांगितले.तानाजी मूळचा लातूरचा रहिवासी आहे. गेले अनेक आठ वर्षे कामानिमित्त पुण्यात राहत होता.मात्र पोलिसांना संशय आला त्यातून त्यानी तपास सुरू केला आणि स्वतः ज्या रिक्षा चालकांनी रिक्षातून ससूनला घेऊन गेले त्याच दोघांनी त्याचा खून केला होता.
आरोपी रिक्षा चालक व त्याच्या साथीदाराला फरासखाना पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.त्याची नावे अतुल उर्फ ईश्वर हराळे व रोहन गोडसे अशी आहेत.जवळ असलेल्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसानी घेतला आरोपीचा शोध घेतला.फरासखाना पोलिसानी गुन्हा दाखल करून केली अटक केली आहे.
या खुनात अजून कोणी सामील आहे का याचा तपास फरासखाना पोलीस करत आहेत.मात्र पुण्यासारख्या शहरात केवळ वीस रूपयासाठी हत्या केल्याने माणुसकी जिवंत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय.