नाशिक शस्त्रसाठा प्रकरणी पाशाला पोलीस कोठडी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा 27 याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी ताबा घेतला.  उत्तर प्रदेशातून लाखोंचा शस्त्रसाठा चोरी करून मुंबईकडे येत असताना नाशिक पोलिसांनी शिवडीतील बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा, सलमान अमानुल्ला खान आणि वडाळ्याचा नागेश […]

नाशिक शस्त्रसाठा प्रकरणी पाशाला पोलीस कोठडी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

नाशिक शस्त्रसाठा प्रकरणातील मुख्य सूत्रधार बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा 27 याचा मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने बुधवारी ताबा घेतला.

 उत्तर प्रदेशातून लाखोंचा शस्त्रसाठा चोरी करून मुंबईकडे येत असताना नाशिक पोलिसांनी शिवडीतील बद्रीनुजमान अकबर बादशहा ऊर्फ सुमीत ऊर्फ सुका ऊर्फ पाशा, सलमान अमानुल्ला खान आणि वडाळ्याचा नागेश राजेंद्र बनसोडे  यांना बेड्या ठोकल्या.

अकबर पाशाला 24 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.आतापर्यंत अकबर पाशासह 11 जणांना अटक करण्यात आली आहे. तर, मुंबईतील अजून 4 संशयितांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number